जिवन सुंदर आहे

पक पक पकाक ! हा मराठी सिनेमा आहे ना सर्वांच्या ध्यानात . खुपच छान सिनेमा आणि त्याही पेक्षा सुंदर या सिनेमा मधुन दिलेला संदेश. मला माहितेय लोक सिनेमा मनोरंजनासाठी बघतात. संदेश जमवन्यासाठी नाही. त्यामुळे बहुतेकांच्या लक्षात तो संदेश आलाच नसेल. पण मि आहे ना ! आपलि सवयच आहे प्रत्येक गोष्टितुन काहितरी संदेश जमवायचि.
तर पक पक पकाक मधला भुत्या (नाना पाटेकर ) आठवतो का ? कधितरी एक नावाजलेला वैद्य असलेला माणुस , माणसांच्या वैरिपणाला बळि पडुन सर्वच गमवुन बसतो. घर मुल बायको राख होते. तो रडतो पडतो धडपडतो ... पण लवकरच त्याला समजुन येते इथे त्याचे काहिच नाही आणि तो नविन आयुष्याच्या शोधात जंगलात वसतो लोकवस्तिच्या दुर , भुत्या बनुन राहतो. त्याचे एक नेहमिचे वाक्य " जिवन सुंदर आहे , मि त्याला आनखि सुंदर बनवणार " अगदि मनावर आत कोरल्या गेलेय त्याचे हे वाक्य ! जो मन लावुन शोधतो, चांगल्या गोष्टिबाबत आशावदी असतो त्याला ते मिळतेच. भुत्या बाबतहि हेच होते. सिनेमाच्या अंति तो हरवलेले सारेच मिळवतो. घर बायको आणि निर्मळ लोकांचि साथ .
तुम्हि म्हणाल हे सर्व फक्त सिनेमात कादम्बरितच घडते. प्रत्यक्षात नाही. मि म्हणते एकदा हवे ते मन लावुन शोधुन तर बघा. नक्कि मिळेल. मि मिळवलेय. कारण जिवन हे सुंदर आहे आणि मि ते आनखि सुंदर बनवणार!
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments