भाषा -वाद
भाषेचा वाद तर तसा खुप जुना आहे . आपल्या राज्यांची निर्मितीहि भाषेनुसारच झालेलि आहे . काळानुसार हा वाद जास्तच वाढतोय नाही का . पण खरच ह्या वादात काही तथ्य आहे का ? मला वाटते तथ्य आहे . कारण आपल्या मात्रुभाषेचा आपल्याशी जन्मजात सम्बंध असतो . आणि आपली संस्क्रुती जर आपल्याला जपायचि असेल तर आपल्या मात्रुभाषेला आपण नक्किच जपायला हवे . तीला आपल्या परिवारात तरि जगवायला हवे . बाकि व्यवहारिक जगात ज्या भाषेचि चलती आहे तिचा खुशाल वापर करा . पण आता आपल्या प्रिय महाराषट्रातिल चित्र पार बदललेय . आताची पिढी घरातही मराठी बोलु पाहत नाही . आणि त्यांच्यासोबत आपण संवाद साधु शकलो पाहिजे म्हणुन वयोव्रुध्द इंग्रजी शिकत आहेत . आधि जिवनावश्यक वस्तु म्हटले कि अन्न वस्त्र निवारा बोलले जायचे . आज काही नसले तरिही चालेल इंग्रजी तुम्हाला बोलता आलिच पाहिजे . एका परकिय भाषेला इतके महत्व आले तरि कसे ? कुणि दिले ? आपणच ! चिन , जपान , कोरिया , जर्मन किती पुढारलेले देश आहेत . पण शक्य होइल तितकि जास्त आपलिच मात्रुभाषा वापरतात . का त्यान्न पुढे नाही का जायचे ? जायचे आहे पण आंधळेपनाने अणुकरन करुन नाही जसे आपण करतोय . आपण स्वतालाच मागे ठेवलेय . आपल्या देशात जितके परकिय भाषांचे वर्ग चालतात , तितके काय त्याच्या 1/4 तरि आपल्या मात्रुभाषेचे वर्ग परदेशात चालतात का? आणि इंग्रजी भाषे सोबत तर मुकाबलाच करु नये . इंग्रजी शब्दांचे इतके गुलाम झालोय कि आपल्या भाषेतील शब्दही आपल्याला अनोळखि वाटतात .
मनपा ते माळवाडिसाठी महिलांसाठी वेगळी बस असते . ठळक अक्षरात महीलांसाठी असे फळिवर लिहीलेले असुनही पुरुष बसमधे चढतात . तेव्हा कंडक्टर महीलांसाठी असे मोठ्याने ओरडुनही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही . पण जेव्हा तोच कंडक्टर ladies only म्हणतो तेव्हा ति पुरुष मंडळी पटापटा बस बाहेर पडतात . स्पेलिंग माहित नसुनही दुकानांवर सर्रास इंग्रजी नावे टाकली जातात . मुल बोलायला सुरवात करायच्या आधीच A for apple शिकवले जाते . मोठे झाले कि तेच मुल घरातिल मोठ्यान्ना इंग्रजी बोलता येत नाही म्हणुन डिचवते . अन generation gap च्या नावाखाली घरात संवादच होत नाहीत . अबोला तळे ठोकते. ह्याला जबाबदार कोण ? भाषा हि आपली जिवन वाहिनी आहे . तिचे रक्षन - संवर्धन आपणच करायला हवे . आणि म्हणुनच आपण हे आंधळे अणुकरण थाम्बवायलाच हवे. कमित कमि आपल्या मुलान्ना घरात तरि आपली भाषा बोलयला शिकवा.writer, Archana Sonagre. M.A. (PublAdmin).

Comments
Post a Comment