दिवाळसण

कितीही बदल करायचे करा
आधूनिक व्हायचे, व्हा ..

आमुची नवलाई ,
दिवाळीला नको धिरंगाई ..

विकतचा फराळ आणू आम्ही
तयार रांगोळी दारात मांडु आम्ही..

नको शालु , वा जरिचा काठ
डिझायनर साडी हवि झक्कास..
जींसचि तर वेगळीच बात ..

फटाक्यांच्या धुराचि नका करु काळजी
फुलझडी अन लवंगीवरच आम्ही समाधान मानु ..

शोर्टकट सर्व निपटून घेउ
तरीही दिवाळी साजरी करु

आमचा सण आम्ही नक्कीच जपु
आमची संस्कृती आम्ही सांभाळू


Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments