शाळा

अधिर होते मन
बधिर होते तन
परत कधीच जाणे नाही त्या वळणावर
विचाराने ह्या वाटते हळहळ...

गार तो वारा , माझ्या शाळेचा निवारा
मोठे ते पटांगण, त्यात गोल गोल रिंगण..
असंख्य आठवणिंचे ते स्पंदन...

मास्तरांची छडी वाजे हातावर छम छम
तरीही मस्तिचि लहर येइच घम घम ..
जसे त्या क्षणान्ना कशाचे वाटेना बंधन..

गणवेश अन दफ्तर म्हणजे आमचे संपुर्ण जग .
तिच आमची तिजोरी अन तोच आमचा ऐवज..

घालायचो गोंधळ, मांडायचो उच्छाद
धास्तिने आमच्या रोडावले मास्तर..
खुन्नस आमची आग अन पाण्याची
आता हसुन हसुन आठवायचि ..

निरोप समारंभात का माहित नाही
गहिवरले सारे जन ?
इतके दिवस उर्मित  गेले
अन आता का हे उदासवाने क्षण???

मास्तरांनीहि प्रेमाचे बोलले बोल
शत्रु असा कसा झाला हो हतबल??

खुप छान ते दिवस
गोंदुन घेतलेत हृदयावर...





Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments