स्वयम प्रेरित..... स्वतःला सतत प्रेरणा द्या

          मि एक अबोल , बुजरि , आत्मविश्वासाचा अभाव असलेली म्हणून घरात तसेच नातेवाईकांमधे ओळखली जायची. एका ठिकाणी बसलि कि तिथेच बसुन राहायची. मूठभर साखर एक एक दाना करुन एक दिड तास खायची . उत्साह नावाची गोष्ट मझ्यात नव्हतीच बहुतेक. क वर्गातील ढ मुलीही माझ्यापेक्षा स्मार्ट राहायच्या . मिच आपणहुन मुलींच्या घोळक्यात त्यांच्या मागे मागे फिरायची . कारण कुणी मला स्वतःहून आपली मैत्रीण बनवेल किंवा माझ्याशी मैत्री करेल असे मझ्यात काहीच नव्हते. मन दुखी होते. स्वतःविषयी मनात खूप वाईट वाटायचे.
         वर्गातील फेमस मुलीला copy करायचा प्रयत्नहि खूप वेळा केला. पण तो फसला कारण मि माझे व्यक्तिमत्त्व सर्व वेगळे. मग आणखी कुणाचा साज माझ्यावर कसा चढनार. हे माझ्या लवकरच लक्षात आले . मि माझा शोध सुरू केला. अशातच नवव्या वर्गापासून एक नविन मुलगी आमच्या वर्गात आली. तिला नक्की माझ्याबद्दल काय वाटले माहित नाही. पण तिने मला तिची मैत्रीण म्हणून स्वीकारले. माझा आत्मविश्वास वाढीस लागला. मि दहावी ५७ % घेऊन पास झाली. घरी सर्वांना खूप आनंद झाला. (आमच्या घराण्यात दहावी पुढे शिक्षण घेणारी मि पहिली स्त्री ).
            घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे B.A. घेतले . जेव्हाकी माझी इच्छा सायन्स घ्यायची होती. त्यात माझा आत्मविश्वास हा खूप कमजोर होता. आणि आवश्यकतेपेक्षा जास्त भावूक असल्यामुळे मि एका निर्णयावर जास्त काळ ठाम नाही राहु शकली.
            योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्या आयुष्यात किती महत्वाची असते ते मला आता आता कळले. तसेच त्या निर्णयांवर पश्चात्ताप करायची वेळ येउ नये म्हणून अथक परिश्रम घेण्याची व आपले धैय्य मिळवण्यासाठी खूप सहनशीलता हवी असते. माझ्यात दोन्हीही गोष्टींचा खूप अभाव होता. कारण मला वाटायचे कि मि असेच करावे ज्याने माझे आई बाबा आनंदी होतील. पण करायचे काहि असायचे अन व्हायचे दुसरेच काही. कारण कशाचिच प्लानिंग नव्हती. अन मि मनानें खूप दुबळी होती.                  हे सर्व आता का बोलतेय मि ? हा प्रश्न आलाच असेल तुमच्या मनात. उत्तर असे कि मि अजूनही स्वतःला डेव्हलप करतेय . हळु हळु का होइना मि स्वतःला जाणुन घेतेय . त्यासाठी मि सतत मोटिव्हेशनल पुस्तके, आत्मचरित्र , लेख मिळेल ते वाचत असते . मला माझ्या ह्या सवयीचा खरचं अभिमान वाटतो . कारण मि वाचतेय म्हणून वाचतेय असेच मला वाटते. खुप अभावान्नी भरलेले जीवन होते माझे. पण ह्या वाचनाच्या नादाने सतत वाचवले मला. स्मार्ट बनण्यासाठी सर्व प्रयत्न केले. आज मला कुणी पाहिले तर म्हणनार नाही कि मि खरच वरिल दिल्याप्रमाणे होती म्हणून. मुख्य म्हणजे मि वयाच्या पेक्षा खूप लहान दिसते. जे प्रत्येक मुलीला हवे असते . अंशु झाल्यावर Master of labour studies पूर्ण केले. मागीलवर्षी एक वर्ष आत्मविश्वासाने नौकरी केली. पण एक स्थैर्य हवे म्हणून सरकारी नौकरीकरिता आता प्रयत्न करतेय .
          मागील आठवड्यात अचानकपणे मन खूप खिन्न विषण्ण झाले होते. कारण नसतांना रडू येत होते, ऱाग येत होता, चिड चिड होत होती; एकटेपणाचा प्रभाव दुसरे काय . आई लखनौला फिरायला गेलेली. घरात मि अन मरणाच्या दारात असलेली बाजिला खिळलेली आजी ! आईला फोन करून सांगितले , मला वाटते मि वेडी होइल. तु लवकर ये . आपण सायकोलोजिस्ट कडे जाउ.
          ति एका गृप सोबत गेली होती आणि त्यांना सोडून असे येणे शक्य नव्हते. कारण बाबा आणि अंशु होते माझ्या सोबतीला. पण बाबा ड्युटीवर जायचे आणि अंशुला मि काय सांगणार! भूतकाळातील घटना सतत मला डसत होता आणि ह्या भूतलावर मिच एक रिकामटेकडी होती. कुणाला माझ्यासाठी वेळ नव्हता. बुधवारी मि शुल्लक कारणास्तव अंशुला जोरात रागावले. तो भीतीने हादरला आणि रडु लागला. बिचारा तिन वर्षांचा मुलगा. मला समजले कि मला स्वतःलाच माझी मदत करावी लागेल . मि स्नॅपडिल वरुन The Monk Who sold his Ferrari ,written by robin sharma बोलावले. गुरुवारी संध्याकाळी ते माझ्या हातात आले आणि आयुष्याच्या नविन पर्वाची सुरुवात झाली.
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments