अहिल्यादेवी होळकर

आज ३१ मे २०१६ , अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. सकाळ या मराठी वृत्तपत्रात वसंतराव सोनोने ह्यांचा अहिल्यादेवी विषयी खुप छान लेख वाचला. काही गोष्टी तर माझ्या मनात सतत येणाऱ्या आहेत त्या लेखात. जसे लहानपनापासून मि अहिल्यादेविंचा  एकच फोटो पाहिला . तो म्हणजे हातात शिवलिंग घेतलेला . त्यामुळे अहिल्यादेवी ह्या खूप धार्मिक असतील असे मला वाटायचे . तसेच त्यांनी महादेवाची जागोजागी मंदिरे बांधल्याचेहि ऐकून होते. पण सविस्तर इतिहास संशोधन केले असता असे लक्षात येते कि अहिल्यादेवी ह्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. जशी त्यांची महादेवाच्या ठायी भक्ती होती तशीच त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. सर्वधर्म समभाव त्यांच्या हृदयीं होता. म्हणून त्यांच्यावर प्रजेचे प्रेम होते. वेळ पडलि तेव्हा तलवार घेउन रणांगणात उतरल्या . स्त्रियांना शिक्षित केले. त्यांची फौज निर्माण केली. अन बंडखोरांचा बंदोबस्त केला . अशा कर्तव्यदक्ष स्त्रीच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पुस्तक किती शोभेल ! कल्पना करा अशा त्यांच्या चित्राची खूप छान वाटते. आणि हो मला वसंतराव सोनोने ह्यांनी लिहिलेल्या दोन ओळी खुपच भावल्या . त्या अशा कि , सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या टिळकांच्या हातात गणपती किंवा त्यांना गणपतीची पूजा करतांना कोठेही दाखवलेले नाही . परंतु आपल्या तलवारीच्या बळावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाचे राज्य टिकवणारी रणरागिणी अहिल्याबाईंना जाणीवपुर्वक दुर्लक्षित ठेवले . त्यांना त्या फोटोच्या चौकटीत जणु कैद केले . असे मला मनापासुन वाटते. दिनांक १३ आगस्ट १७९५ रोजी ह्या राजमातेच्या पुण्यत्म्याने देहत्याग केला. अशा देवी चरणी हि छोटीशी श्रध्दांजली.
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments