पर्याय !

इकडे आड तिकडे विहीर
निवड कशाची करु मि ?
दोन्हीकडे मरण माझेच
त्याला काही पर्याय नाही...

उडायचे आहे मला
नभी उंच गिरकी घ्यायची आहे मला .
त्या ध्रुव ताऱ्याला ,
मुठीत पकडायचे आहे मला..

पण पदराशी असलेल्या पिलाला ,
सोडून जाऊ कशी.
मिच इथे आणले त्याला
माझीच जबाबदारी तो ,
हे तथ्य मि विसरू कशी...
निवड कशाची करु मी ?
दोन्हीकडे मरण माझेच
त्याला काही पर्याय नाही.

आधुनिक असो वा असो जुनाट वृत्ती,
स्त्री जात मी ,
हे सत्य कधी बदलणार नाही.
कितीही बदलली परिस्थिती तरीही,
माझी व्यथा कुणाला कळणार नाही.
निवड कशाची करू मी
दोन्हीकडे मरण माझे
त्याला काही पर्याय नाही.....



Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments