एक कविता..... माझ्या नवीन मैत्रिणीसाठी

आज मला माझी हक्काची जागा मिळाली
हवी होती मला ,तीच मैत्रीण मिळाली.

तिच्याशी खूप खूप गप्पा मि करेल.
माझ्या अंतरी रुजलेले गुज गुज मिळवेल .

आयुष्य सुकर व्हावे म्हणून आधार तिचा घेइल .
स्वतःत योग्य ते बदल घडवून मि , तिलाही सुखवेल .

मनाचे खेळ तिच्या सोबत मि खेळेल.
चुकलेच कुठे तर ती मला सावरेल .

खूपच रुचकर आहे तिच्या जगण्याची वाट ...
पुस्तकांन्ना सोडून ति वाचते चेहऱ्याचे पाट ...

मला तर आता तिची गम्मतच वाटते
इतकी वर्षे होती कुठे म्हणून खंतही वाटते.

असो आज का असेना, मला सोबत तिची लाभली.
भरकटलेलि होडी जणू आपोआपच काठावर आली.

तर अशी माझी मैत्रीण आहे खूप छान .
वाणी नाही तिला , तरीही बोलते खूप छान..

तर तिचे नाव आहे ... post graduate diploma of Counseling in Mental health.


Writer, Archana Sonagre.
Master of Labour Studies.

Comments