मि अबोल

होती मि अबोल,
स्वतःच्या विश्वातच खोल,
आंतरिक भीतीने घर केले होते ,
माझ्यात सखोल...

वाटत होते मंचावर जाऊन बोलणे मला जमणार नाही,
श्रोत्यांचे टिकास्त्र मला पेलवनार नाही.

पण व्यासपीठावर पाऊल ठेवताच एक जादू घडली,
आत्मविश्वासाने माझ्या उंच भरारी घेतली.

एक दीर्घ श्वास घेउन मि कविता सादर केली,
स्मित हास्याने श्रोत्यांच्या मला दाद मिळाली.

अशा तर्हेने कवयित्री म्हणून,
माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.

अन माझ्यातिल लाजरी बुजरी मि,
त्या वळणावर तिथेच थांबली...

पुढे आली ति अर्चना तर मलाही अनोळखीच वाटली,
नवचैतन्याने सळसळती मिच जणू मला साद घातली...






Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments