अस्तित्व

ती होती आगळी वेगळी,
निराळीच होती तिची कथा सगळी.

कळपात चालनं तिला जमत नव्हतं ,
कुणाची हाजी हाजी करनंही तिला येत नव्हतं ,
चुकलेल्याला उगाचच पाठिंबा देणं योग्य वाटत नव्हतं

इतर स्त्रियांसारखं घरात पाऊल थांबत नव्हतं ,
चार चौघित बसून गप्पा मारनं हिच्यासाठी कठीण होतं ,
कधी कधी खूप एकटं वाटे तीला,
आपण आहोत विक्षिप्त असं वाटे तिला,
कारण काय म्हणतील लोक ?
ह्या रोगाची लागण झाली होती तीला.

म्हणून तिनं तिच्या स्वभावा विरुद्ध पाऊल उचललं ,
आजूबाजूच्या चार चौघीत बसू उठू लागली,
त्यांच्यातील एक म्हणून ओळखले जाण्यासाठी धडपडु लागली.
परिणामी तिचं मन दुखावलं गेलं तिच्याही नकळत,
कारण नको तिथं तिचं अस्तित्व ती शोधत होती.
कदाचित ग. दि. मा. ची 'तो राजहंस एक ' कविता तिच्या वाचनात कधी आलिच नव्हती..

Writer, Archana Sonagre.
PGD in Counseling and Mental Health,
Masters of Labour Studies,
M.A. (Public Admin).

Comments