कोहिनुर
एका दगडाची गोष्टं !
ऐका लोकहो एका दगडाची गोष्टं ,
कुठं कुठं हिंडला बिचारा ,
पाणी पिलं त्यानं साऱ्याच गावाचं !
देवीच्या डोळ्यातून गेला ,
मुघलांच्या मयूरासनात शोभला ,
राज्याच्या खजिन्यात पडला ....
जिथं जिथं फिरला नाश झाला ,
वंशावळ थांबली तिथं !
कुणी लढवली माहित नाही शक्कल ,
अहो पुरुषाला ना लाभी तो दगड ,
होईल पावन जेव्हा धारण करेल कुणी नार ,
अखेर जाऊन विसावला राणीच्या मुकुटात !
अन बघा हो चमत्कार !
भरभराटीत आहे तीचं राज्यं .
परि इतिहासाला खूपच वेगवेगळे पैलू ,
कुणी म्हणे दिला , कुणी म्हणे चोरीला
तर कुणी म्हणे बळजबरीनं हिरावला ...
जुनी कागद पत्रं पहातांना काल हि कवीता मिळाली . हि कविता मी कधी व का लिहिली ते आता आठवत नाही . पण वर्णन वाचून जाणवतं कि हि कविता कोहिनुर हिऱ्याला उल्लेखून लिहिली आहे एवढं नक्की .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin), (Master of labour studies), (PGD in Mental health)

Comments
Post a Comment