मागे वळून पाहतांना - वय !
मागे वळुन पाहतांना - वय !
खूप छान वाटायचं जेव्हा कुणी म्हणायचं ,"अगं तू तर खूपच लहान वाटतेस ! आणि मुलगा पण आहे तुला ? लवकर लग्न झालेले दिसतं ."
मग केवळ प्रयोग म्हणून मी कोणाला २४ ची असल्याचं सांगायची तर कुणाला २५ ची . ते समोरील व्यक्तीला पटतही होते . म्हणून स्वतःचं भारी कौतुक वाटायचं . आणि कोणाला नाही आवडणार वयापेक्षा ५-६ वर्षांनी लहान म्हणवून घेतल्याचं ? दोष त्यांचा नव्हताच मुळी , माझी सडसडीत अंगकाठी अन चेहऱ्यावरील बालिश भाव त्याला जबाबदार होते . त्यातही मी कुठल्याशा मासिकात वाचले होते कि स्त्रिया आपल्या तिशीत जीवनात सर्वात सुंदर दिसतात . असेच असेल काही !
पण आता ह्या लहान म्हणवून घ्यायचा अन बालिशपणे लाडवण्याचा जाम कंटाळा आला आहे . आयुष्याच्या या टप्प्यावर मला कुणाशीच खोटं नाही बोलायचं . यापुढे मी सर्वांना माझं खरं वय सांगणार आहे आणि ते म्हणजे मी ३२ वर्षांची आहे . १५ ऑक्टोबर २०१७ पासून मला ३३सावं लागलं आहे . आयुष्याचा अर्धा भाग जगुन झालाय . तशी हातात काही मिळकत तर दिसत नाही पण खूप संपत्ती जोडलीय मी ,
पैशांचा सडा नाही माझ्या अंगणी
पण माणसांचा पार बाजार जमावलाय मी !
आदर्श नाही बनली कुणासाठी
पण माझ्या आदर्शांचे पुरेपूर अनुकरण केले मी !
उंच ध्रुवावर नाही पोहोचली अजून
पण आयुष्याचं डोंगर चढलीय मी !
वयाच्या पारंब्या लहानच दिसतात
पण मनाच्या धाग्यांचे अंतर अगणित चाललेय मी !
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments
Post a Comment