Nakoshi Pragati
तो खूप दूर दूर राहतो माझ्या पासून
जवळ असूनही स्वतःतच व्यग्र वाटतो केव्हा पासून ,
म्हणतो तूच माझ्या प्रगतीची हकदार ,
तूच माझ्या स्वप्नांचा आकार ...
पण त्याच्या ह्या प्रगतीत मी मागे राहिल्या सारखी वाटते .
त्याच्या स्वप्नात माझे अस्तित्वच हरवते ..
"ट्रिंग ट्रिंग "
कोणाला वेळ मिळालाय मला फोन करायला ? कितितरी दिवसांनी आज बसलीय कविता लिहायला , मनातील मळभ शब्दात उतरवून दूर करायला . मरू दे त्या फ़ोनला . आज दिवस निघालाय कविता लिहायला . काय लिहिलं मी ? हं .. त्याच्या बद्दलच लिहिलंय . किती बदलला तो ? काय होता जेव्हा लग्न झाले आमचे ? एक साधा हेल्पर , आयटिया झालेला आणि मी एम ए झालेली . पण तरीही मनापासून आपलं मानलं त्याला. इंग्रजीचा एक एक शब्द शिकवून पुढे नेलं त्याला . त्याची मेहनत पाहून इंजिनीयरचा अभ्यास करून घेतला त्याच्या कडून . आत्मविश्वास बळावला त्याचा आणि त्याच्या बळा वलेल्या पंखांनी कधी झेप घेतली कळलंच नाही . माझ्या हातातून निसटत राहिला रेती सारखा अन मीही निसटू दिले त्याला .
नाही , तसे काही झाले नाही . दुसरी कुणी मिळाली नाही त्याला . त्याबाबतीत तो सदैव माझ्याशी इमानदार राहिला . परतून नेहमी माझ्या जवळच आला . प्रेमाचा लवलेशही झाला . मग काय झालं ? मला का रितं रितं वाटतं ? कधी कधी खूप एकट वाटतं ?
माझ्या मैत्रिणी म्हणतात ,"तो माझ्यापुढे गेला म्हणून मला आतल्या आत हेवा वाटतो त्याचा ."
अरे पण मला का हेवा वाटावा त्याच्या प्रगतीचा ??? कारण त्याला हे मुकाम मिळवून देण्यात सर्वात जास्त हात माझाच होता . जितक्या रात्री तो जागला , तितक्या रात्री माझ्याही पापन्या उघड्या होत्या .
मग ... हं विसंगती वाढली आमच्यातली . तो एका नामांकित कंपनीत राज्यस्तरीय मॅनेजर झाला . आठवड्यातील पाच दिवस शहरो शहरी फिरू लागला . मी मात्र हाउस वाइफ बनून राहिली . आजकाल होम मेकर म्हणतात . त्याच्या वेळा सांभाळण्यात , मुलांच्या शाळा सांभाळण्यात माझ्यातील लेखिकेला मारलेच मी...
विसरली पावसाच्या सरींना
शब्दात गुंफायला
मुकली साहित्याच्या क्षेत्रात
भरारी घ्यायला !!
आज जेव्हा सर्व आपापल्या कामी लागली तेव्हा रिकामपन वाढलं माझं . म्हणून भकास वाटतेय मला . नकोशी वाटतेय त्याची हि प्रगती . जी त्याला एक क्षण नाही काढू देत माझ्यासाठी . त्याला माझ्या ह्या तळमळीची जाणीव असेल का ? आधी कसं माझ्या मनातलं लगेच कळायचं त्याला . सहजच एकदा म्हटलं,"आधी कसा रे अगदी चेहरा पाहताक्षणी ओळखायचास तू माझ्या अंतरीचा भाव !!"
तर म्हणाला ,"अगं , तेव्हासारखा वेळ कुठे आहे आता माझ्याकडे तुझा चेहरा वाचायला ?" हसूच आलं स्वतः वर . केविलवाणं हसू . वाटलं स्वतः च्या हातून पायावर धोंडा मारून घेतला ...

Archana Sonagre.
M.A. (Public Admin), Master of Labor studies, Post Graduate Diploma in Mental health
Comments
Post a Comment