स्व लिखीत उखाणे आमच्या अहोंसाठी

१. डोळ्यांवर लागलाय भिंगाचा चष्मा
      पिकसेल्या केसांना काळं लावुन लपवा
         दाढी मिशी नका ठेवू , आपला गोटाच बरा
           अहो विनोदराव चला घरी, आता वाजले कि बारा


२. डोंगर माथ्यावर हवं टुमदार घरटं
     निसर्ग सान्निध्यात आपणच राहायचं दुकटं
       पहाटे ऐकावं कोकीळेचं गाणं
         बेड टी पिऊन परत एक झोप घेणं
           पन आईला सोडून विनोदरावांना करमतं कुठं
   
३. विवाह बंधनात अडकवले आई बाबांनी
     पती पत्नीचे नाते जपले मैत्रिचॅ धाग्यांनी
       आणि हळु हळू मला आपलेसे केले विनोदरावांनी

४. कौलारू घराची जागा घेतलीय
      सिमेंट विटांचया भिंतींनी
        बैलगाडी पडली मागे
     आता चारचाकी गाडी आली
    जेव्हा माप ओलांडून मी विनोदरावांचया घरी आली

लेखीका - अर्चना सोनाग्रे वसतकार

Comments