तिचं अस्तित्व
आपलं असं तिचं नसतंच कुणी
आजुबाजुचं सर्व फसवं असतंच मुळा
त्यातही लग्न झालेल्या तिचे , काय विचारावे हाल
ना धड माहेरची ना धड सासरची
मध्येच कुठेतरी लटकली असते ती नार...
कितिही झिजली तरीही सासर जवळ करत नाही
अन् कितिही जिव तोडला तरी माहेर कुशीत घेत नाही
राब राब राबूनही रितेच असतात तिचे हात
कितिही कष्ट केले तरीही उणिवांची यादी असतेच तयार
तिलाही होतो त्रास , तिचाही होतो जळफळाट
पण तरीही ती सहन करते , तोंड दाबून बुक्क्यांचा मार
अन् उशित तोंड कोंबून अश्रुंना करते मोकळी वाट
सर्व कुटुंबाचा राडा ओढणारी ती
जळत राहते जशी मेणबत्ती
पण हृदयात तिच्याही रक्तच वाहतं
तिचंही शरीर हाडामांसाचंच बनलं असतं
बालपणापासून झालेल्या संस्कारातून तिला बाहेर पडता येत नाही
अन स्वतःच्या हक्कांसाठीही लढा द्यावा वाटत नाही
पण मला आता तिला ह्या सर्वांतून बाहेर काढायचेच आहे
तिलाही मन मोकळं जगण्याचा अधिकार आहे हे पटवून द्यायचं आहे
सासर माहेरच्या पलीकडे असलेल्या जगात तिला घेऊन जायचं आहे
तिचं अस्तित्व निर्माण करण्याची एक संधी तिला द्यायची आहे
आकाशी झेप घेईल ती एवढं बळ तिच्या पंखांना द्यायचं आहे
ह्याच्या त्याच्या आसऱ्या शिवाय जगायला शिकवायचं आहे
माझ्यातील तिला मला आता घडवायचं आहे
माझ्यातील तिला मला आता घडवायचं आहे ...

धन्यवाद !
फोटो साभार गुगल वरून
Writer - Archana Sonagre wasatkar
Writer - Archana Sonagre wasatkar
Master PG diploma in counseling in mental health
Comments
Post a Comment