लॉकडाऊन नंतरचं ऑफिस
4.0 लॉकडाऊन झाल्यावर अनलॉकिंग सुरु झालं तशी ऑफिसही सुरु झालीत. तब्बल दोन महिन्यांनी नेहाने तोंडाला मास्क लावून, डोळ्यावर गॉगल चढवून, हातात ग्लोव्हज आणि डोक्याला स्कार्फ लपेटून ऑफिसला जायची तयारी केली. "यापेक्षा एक बुरखाच घालून घेणं परवडलं." आरशात स्वतः ला न्याहाळतांना तिच्या मनात आलं. घरा बाहेर पडताच मे महिन्याच्या (नौ ताप च्या) उन्हानं तिला दर्शन दिलं. ऑफिसच्या नियमित वेळेवर तिनं ऑफिसमध्ये पाय ठेवला. गेटवरच सीक्यूरिटीनं थर्मल स्कॅनर तिच्या कपाळा समोर धरून बॉडी टेम्परेचर मोजलं.
"101"
"काय?" नेहा भांबावली.
"मॅडम सावलीत थांबा दोन मिनिट मग परत मोजतो."
"अरे मी येतांना गरम दुध पिऊन आली आणि ऊन पन खूप आहे."
"हो मॅडम म्हणूनच म्हटलं सावलीत थांबा."
एखाद्या पनिशमेंट दिलेल्या शाळकरी मुलासारखी ती गेटवरचं झाडाखाली थांबली. 2-3 मिनिट होताच परत टेम्परेचर मोजलं. 98 निघालं. नेहाला हुश्श झालं.
"टेम्परेचर कमी झालं नसतं ना तर गेट वरूनच आपली रवानगी quarantine सेंटर मध्ये झाली असती." तिच्या मनात आलं.
Sanitizer आणि फिनालय च्या वासानं तिला दवाखान्यात पाय ठेवल्याची फिलिंग आली. ऑफिसचा नजारा पाहुन तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. लिफ्ट, पायऱ्या, दारं, फरशी सगळं ऑफिस अगदी चकचकित होतं. तिला खरंच,
"ये कहा आणि गये हम?"
या गाण्याचा फील आला. जागोजागी, प्रत्येक टेबलवर sanitizer ची बॉटल ठेवलेली होती. आपल्या टेबलवर डबा पर्स ठेवायच्या आधी तिनं नेहमीसारखं टेबलवरून कागद फिरवला अन तिला आश्चर्याचा धक्का बसला. कागद स्वच्छच होता.
"मॅडम आताच sanitizer टाकून पुसला हो टेबल.'' प्युन शाम तिला म्हणाला.
"काय?" नेहानं साशंक नजरेनं त्याला पाहलं.
"अहो मॅडम ऑर्डर आहे तशी. सगळे टेबल, खुर्च्या, खिडक्या, दारं दिवसातून दोन वेळा sanitizer नं पुसतो आम्ही."
"बापरे कोरोनानं तर कुत्र्याचं शेपूट सरळ केलं.😃 जय कोरोना बाबा की🙏." ती स्वतःशीच पुटपुटली. कारण या प्युन च्या मागे कितीही लागलं तरीही तो आताच पुसलं असं म्हणायचा. शेवटी नेहानं स्वतःलाच आपला टेबल पुसायची सवय लावून घेतली. पण आता कोरोनाच्या भीतीनं प्यून नीट साफसफाई करु लागले.
मग सहज म्हणून ऑफिसमध्ये चक्कर मारला तर तिला समजलं की ती एकटीच वेळेवर ऑफिसला आली आहे. बाकी मंडळ आरामात येतं. तिला हसूच आलं. कर्मचारी ऑफिसला वेळेवर आले पाहिजे म्हणून किती उठाठेव करण्यात आली. हजेरी रजिस्टर, पंचिंग मशीन, cctv 🤦😃 आणि आता... सगळं बंद 🙆.
हळूहळू वर्दळ झाली. नेहाला बरं वाटलं. कामं सुरु झाली. बॉस ने तिला केबिनमधे बोलावलं. त्यांच्या टेबलवर कपूर ठववलेला होता. एसी सुरु असूनही खिडक्या उघड्या होत्या. सगळं विचित्र वाटलं. लंच ब्रेक झाला. दोन कलीग रेड झोन असलेल्या शहरातून आलेले. नेहा लांबूनच बोलली त्यांच्याशी. पण 14 दिवसांनी यांना कोरोना निघाला तर? तिच्या मनात आलं, "ऑफिस quarantine करण्यात येईल सगळ्या कर्मचाऱ्यांची घरं, आजूबाजुचा परिसर सगळं बंद होईल. बापरे." "नाही असं काहीच होणार नाही." तिनं स्वतःला समजावलं. कारण टेंशन घेणं म्हणजे immunity वीक करणं आणि कोरोनाला आमंत्रण देणं.
तिच्या 3 कलीग सोबत जेवायला बसली. तोच बॉस तिथं आले,
"Where is social distancing?"
"????? "
"Only 2 people on a table with distance. Or eat food on your own table."
वाट लावली कोरोनानं. नाहीतर बॉस जेवण करण्याबद्दल कधीच टोकत नसे. पण ते तरी काय करणार? परिस्थिती सोबत चालायचं म्हटल्यावर नियम पाळणंच योग्य. सगळी मंडळी आपापली कामं आटोपण्यात गुंग होती. कारण आता एक दिवस सोडून ऑफिसला यायचं होतं व सगळी कामंही वेळेवर व्हायला हवी होती. म्हणून तीही आपलं काम करण्यात बिझी झाली.
दुपारी तीन वाजता तिला कडाडून जांभई आली. 2 महिने दुपारी झोपण्यात गेले तेव्हा हे होणारच होतं. डोक्याची नस अन नस फडफड करत होती.
"2-3 दिवसांची सुट्टी खूप झाली रे देवा. परत असं काहीच करु नकोस. अन ह्या कोरोनाला ने आता लवकर." नेहानं मनोमन देवाला प्रार्थना केली.
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये ही विनंती.
धन्यवाद !
फोटो साभार गुगल वरून
Comments
Post a Comment