हॉटेलिंग



नेहा आणि शाम एक हॅपी गो लकी कपल. शहरात दोघेही जॉबवर म्हणून सतत व्यस्त. आरव त्यांचं 7 वर्षाचं एकुलतं एक अपत्य. 1 वर्षाचा होता तेव्हा पासुन घरात

लॉकडाऊन झालं तसं हे फिरस्ती अन खाऊगोब्र कुटुंब घरात अटकलं. तरीही हिरमुसुन न जाता यु ट्यूब वर पाहुन त्यांनी रोज घरात असलेल्याच सामग्रीत वेगवेगळे पदार्थ बनवले. जसे आलू वडा, कांदा भजी, पातोडीची मसाला रस्सा, पिझ्झा, बर्गर, सामोसा, इडली, डोसा, उत्तपम, बिस्कीट केक, फ्रुट कस्टर्ड, सॅन्डविच, पाणीपुरी, भेळ पुरी, कचोरी, कप केक, आईस क्रीम, कुल्फी, टरबूज ची चेरी, छोले भटुरे .... हॉटेल पेक्षाही उत्तम चवीचे.

पण आरवला सारखी हॉटेलची आठवण यायची. अनलॉक सुरु झालं तसा त्यानं नांदाच लावला, 
"आपण पनाश हॉटेल मधे जेवायला कधी जाऊ?" 
आणि का नाही लावणार? आरव 1 दीड वर्षांचा असेल जेव्हा पहिल्यांदा त्याला नेहानं हॉटेलच्या पदार्थाची चव दिली. आधी तर नेहा आणि शाम फक्त काही सेलिब्रेट करायचं असेल तेव्हाच हॉटेलमधे जेवायला जायचे. पुढे कधी घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणून, बॉस नी रागावलं किंवा कोणाशी भांडण झालं त्यामुळे मूड ऑफ झाला म्हणून, महिन्याचा पहिला दिवस आहे म्हणून, रविवार आहे, आराम झाला पाहिजे म्हणून, पुढे आम्ही किती मॉडर्न आहोत, आम्हाला कशाचीच कमतरता नाही, मित्र मैत्रिणीत स्टेटस उंचावण्याच्या नादात शहरातील सगळी हॉटेल्स पालथी घालणं सुरु झालं. असं करता करता यांचं हॉटेलिंग चांगलंच वाढलं. हॉटेल मधे जाणं नाही झालं तर झोमॅटो, उबेर ईट किंवा ऑनलाईन ऑर्डर हे ऑपशन होतेच. मग मुलाला घरचं आवडणार तरी कसं? आवडलं तरी हॉटेल मधे गेल्याच समाधान घरी मिळत नसे. हे काही ठीक नाही म्हणून आता परिस्थिती नॉर्मल झाल्यावर हॉटेल्स उघडले तरीही असं नेहमी हॉटेल मधे जाणं टाळायचं असं नेहा आणि शामनं ठरवलं. हे इतकं सोप्प नक्कीच नव्हतं. कारण हॉटेलच्या जेवणाची आठवण तर या दोघांनाही खूप येत होती. पण ते बाहेरच खाऊन खाऊन ही दोघंही छान फुटली होती. म्हणून मग त्यांनी मनाची तयारी करणं सुरु केलं. तळलेले पदार्थ 15 दिवसातून एकदाच खायचं. चहा बंदच केला. हळद, गुड आणि अद्रकचा काढा घ्यायला सुरु केलं. कितीही मन झालं तरी स्वतःला समजवायचं. योगा प्राणायाम सुरु केला. 
त्या दोघांचं आचरण आरवही करु लागला. अर्थातच हॉटेल च्या पदार्थांना तो इतक्या लवकर विसरणार नव्हता. पण हिच दिनचर्या ठेवली आणि चांगल्या सवयींचं पालन केलं तर त्याला हॉटेल पासून दूर ठेवता येईल इतकं नक्कीच होतं.
सध्या नेहा आणि शाम सारखे कितीतरी आईवडील ह्या समस्येला तोंड देत असतील. त्यांनी चिडून न जाता किंवा वैताग न करता असं समजावं की ही त्यांना त्यांच्या मुलांना आणि स्वतः लाही, खाण्या पिण्याच्या बाबतीत चांगलं वळण लावायची सुवर्ण संधी आहे. 
हा थोडाफार माझाही अनुभव आहे. मला पिझ्झा भयानक आवडायचा. महिन्यातून 2-3 वेळा बाहेरून आणि आठवड्यातून एकदा घरी नियमित पिझ्झा बनवून खाल्ल्या जाई. त्यामुळे मुलालाही पिझ्झा आवडू लागला. पण लॉकडाऊन मधे हळूहळू मी स्वतः माझ्या आवडीवर कंट्रोल केलं. आता 4 महिने झाले फक्त एकदाच डॉमिनोज चा पिझ्झा खाल्लेला. आणि घरीही 2 वेळाच बनवला. 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master in PG diploma in MENTAL HEALTH 
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये.

धन्यवाद !

फोटो साभार गुगल वरून 

Comments