कुठेतरी थांबायला हवं (लघुकथा)
कीर्ती आजही ऑफिसला उशिरा आल्याचं पाहुन बॉसनं जाम झापलं.गुपचूप आसू पुसत ती जागेवर येऊन बसली.तो नवऱ्याचा फोन आला,"भाजीत किती हळद टाकलिस?डाळ किती बेचव केली आणि पोळ्या...छी!"
ति विचार करु लागली, कोरोनामुळे मोलकरीण सुट्टीवर, (शाळा नाही म्हणून) मुलं, (ऑफिस बंद म्हणून) नवरा आणि सासू सासरे घरीच!तरीही आपण नाश्ता,स्वयंपाक,धुणं भांडी आटोपून कामावर येतो.घरी गेल्यावर परत तेच सगळं.त्यात हे असले बोलणे अन मनस्ताप,टेंशन यामुळे आपली तब्येत खराब झाली तर घर कोण चालवणार? हे सगळं कुठेतरी थांबायला हवं.
नवरा बोलतच होता,"आईनी किती ऐकवलं मला. बघ तुला जमत नसेल तर सांग आम्ही करतो आमचं."
"मीही तेच म्हणतेय.तुम्ही करा तुमचं.उरलं तर माझ्यासाठीही ठेवा." फोन ठेऊन ती स्वतःशीच हसली. जणू तीला आता कुठे थांबायचं हे कळलं.
फोटो साभार गुगल वरून 🙏
धन्यवाद
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
Comments
Post a Comment