गौरी वानखडे.. चित्रपट सृष्टीतील उगवता तारा
कॉलेज कॅम्पस मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी तिला भेटली, तेव्हा ती मला अगदीच सोज्वळ मराठी मुलगी भासली. लांब केसांची एक वेणी, चेहऱ्यावर काहीच मेकअप नाही. साधासा सलवार कमीज अंगावर चढवलेला आणि सायकलने कॉलेजला येणारी. आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण म्हणून खचून न जाता काहीतरी करायचंच अशी जिद्द मनाशी बाळगून जगणारी. आमच्या ग्रुप मधील सर्वात समजदार मुलगी. आम्हा चारही येड्यांना सांभाळून घेणारी. आम्हाला कायम चांगुलपणाचे, समजदारीचे धडे देणारी. माझा कायम भडकणारा स्वभाव म्हणून मला लाडानं, "ए मिर्ची" असं संबोधणारी. असं भडकून चालत नाही. शांत पने विचार करत जा. मिळालं तर छानचं, नाही मिळालं तर ते आपलं नव्हतंच कधी. अशा स्वभावाची. मला समजेना ही इतकी सोशिक आणि समजदार कशी काय? दिखावा करते का? असंही वाटायचं. पण आम्ही मैत्रिणी आमची गुपितं तिच्या जवळच मोकळ्या करायचो बरं. इतका विश्वास तिच्यावर आमचा. तीनंही कधीच जज केलं नाही. फक्त परिणामांची जाणीव करून द्यायची. बाकी निर्णय आमच्यावर सोडायची.
खूपच धाडशी वाटायची ती मला. भीती नावाचा शब्द नव्हताच तिच्या डिक्शनरीत. ना कोणावर अवलंबून राहायची इच्छा होती तिच्यात. तेव्हा ती तिच्या जोरावर काहीतरी करेल याची खात्री होती पण असं काही करेल असं वाटलं नव्हतं. कारण असं काही तिनं स्वतःही कधी चितलं नव्हतं. ( कॉलेजला असतांना तर नक्कीच नाही.)
अचानक फायनल इयरची परीक्षा होताच आमची ही गाय गायब झाली. फोन नंबर बदलला. जुना बंद झाला. मग अचानक कधीतरी तिचाच कॉल येई तेव्हा खूप भरभरून बोलायची. असंच एकदा तिचा फोन आला. राजस्थानी चित्रपट सृष्टीत काम मिळालं हे तिनं सांगितलं तेव्हा तर झटकाच बसला कारण आमची गौ बया हिरोईन मटेरियल नक्कीच वाटत नव्हती.
आज बयेचे अगदी बिनधास्त पोझ दिलेले फोटो बघते ना तेव्हा स्वतःलाच विचारते, "हिच का ती भोळसट गौरी?" हो जिच्या बद्दल मी बोलतेय तिचं नाव आहे 'गौरी वानखेडे.' सध्या काही मराठी चित्रपटामध्येही ती झळकली आहे. पण सर्वात महत्वाचे मला तिच्याबद्दल एकच वाटतं ते म्हणजे ती तिच्या मुळांना अजिबात विसरली नाही. मागच्या वर्षी तिच्या पुढाकारानेच आम्ही मैत्रिणी भेटलो. तेव्हा वाटलं ती सोबतच तर होती आमच्या. वेगळी कधी झालीच नाही.
अशा माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. तूझ्या क्षेत्रात तु खूप नाव कमवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपली लवकरच भेट होवो ही सदिच्छा.
टीप : प्लीज हं कितवा वाढदिवस ते कोणी विचारू नका. हिरोईन आहे गौरी 😜😍😘😇
आमच्या गौरीचा 'गलतिया' हा प्रेम कहाणीवर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. नक्की पाहा हं !
गौरी ही राजस्थानी फिल्म जगतची स्टार आहे. त्यासाठी तिला RFFA बेस्ट ऍक्टरेस अवॉर्डही मिळाला आहे.
गौरीनं आतापर्यंत महासत्ता2035 आणि मान्सूनफुटबॉल या मराठी चित्रपटात काम केलं आहे.
तसेच #श्रीदेवीबंगलो या हिंदी चित्रपटातही तिची महत्वाची भूमिका आहे.
®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
Master diploma in counseling in mental health
फोटो गौरी वानखेडे (ऍक्टर आणि मॉडेल )
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरु
नये ही विनंती.
धन्यवाद !
Comments
Post a Comment